Saturday, September 5, 2009

Prabodhan Geete [Marathi]

prabodhan geete hi prabodhakansathi sfurti denari asavit ashich kahi geete




शतकातुनि द्रष्ट्यांचे स्वर निनादती


शतकातुनि द्रष्ट्यांचे स्वर निनादती
            अग्रेसर हिन्दु राष्ट्र हिन्दु संस्कृती    ॥ध्रु॥

इतिहासा ज्ञात असे शौर्य येथले
यज्ञाग्नी सर्वप्रथम येथ चेतले
देशास्तव प्रथम दिल्या इथुनि आहुती  ॥१॥

परदास्ये होते जधि राष्ट्र घेरले
संतांनी सदविचार येथ पेरले
सत्वाचि ठेवियलि ज्योत जागती   ॥२॥

स्वातंत्र्यास्तव कितीक अथक झुंजले
फाशीचे दोर कुणी हसत चुंबिले
रक्ताला चेतविती प्रखर त्या स्म्रुती  ॥३॥

वाढतसे ज्ञान इथे खडक फोडुनी
साकळत्या रुढींचे बंध तोडुनी
प्रतिभेला नित्य नव्या लभती मिती  ॥४॥

ध्यासांचे ज्वालावन आज उसळु दे
कतृत्वातून नवे स्वप्न उमलु दे
संगर हे आम्हि रथि आम्हिच सारथी  ॥५॥


ध्येयाचा सुगंध लाभला जीवाना 
ध्येयाचा सुगंध लाभला जीवाना 
आता समरपाणा पूर्ण व्हावी !!ध्रु!! 

क्रोध अहंकार जावो निरसून  
विशुध्द कांचन उजळावे !!1!! 

ईरशा-असुयेला नाही येथ स्थान 
निर्मळ चैतन्य खळाळते !!2!! 

प्रबोधिनिपद्म हिंदू राष्ट्रा पायी  
त्याचा अंश मी ही धन्य झालो !!3!! 


शतकातूनी द्रष्ट्यांचे स्वर निनादति 



शतकातूनी द्रष्ट्यांचे स्वर निनादति 
अग्रेसर हिन्दुराष्ट्र हिन्दु संस्कृती असे स्वर निनादति !!ध्रु!! 

इतिहासा ज्ञात असे शौर्य येथले 
यद्न्याग्नि सर्व प्रथम येथ चेतले 
देशास्तव प्रथम दिल्या इथुनी आहुती !!1!! 

परदास्ते होते जधि राष्ट्र घेरले 
संतानी सद्वीचार येथ पेरले 
सत्वाचि ठेवीयली ज्योत जागती !!2!! 

स्वातंत्र्यासाठी कितीक अथक झुंज़ले  
फाशीचे दोर कुणी हसत चुंबिले 
रक्ताला चेतवीती प्रखर त्या स्मृती !!3!! 

वाढतसे ज्ञान इथे खडक फोडूनी 
सकळ्त्या रूढींचे बन्ध तोडूनी  
प्रतिभेला नित्य नव्या लाभती मिती !!4!! 

ध्यासांचे ज्वालावन आज उसळु दे 
कर्तुत्वातुन नवे स्वप्न उमलु दे 
संगर हे आम्हि रथी आम्हीच सारथी !!5!! 



मज श्रेय गवसले हो.... 


हिंदू भूमीच्या गौरवात मज श्रेय गवसले हो  
शुभ्र कमल हृदयात विकसले हो

अहंपणाचे तुटता अडसर अत्मशक्तिचे विमुक्त निर्झर  
दो तीराना फुलवित फळवित हसत निघाले हो 

स्फटिक गृहिच्या दीपा परि मन प्रसन्नतेने ये ओसंडून  
चिरंतनाच्या चिंतनात मग सहजची रमले हो 

ध्रुवपरि दृढ ध्येयाप्वणाता  
रुजू समर्थत कार्याशाराणता  
बहूत शोधूनि हे जिवनस्वर आज उमगले हो 

हवे कुणा घर माझे त्रिभुवन  
अप्त ची सगळे सुहृद प्रियजन 
कोटी कारांनी श्री जगदम्बेने कुशीत घेतले हो